Donate Us | Saves Life

"रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान"

मानवाची निर्मिति ही ईश्वराची सर्वात श्रेष्ठ कलाकृती. मानवाचे जीवन म्हणजे ईश्वराची देणगी आहे. मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक नवनवीन प्रयोग करत आपले जीवन निरोगी व सुखकर करण्याचा प्रयास चालवला आहे. असे असुनही मानवाला आजतागायत रक्ताला पर्याय शोधता आला नाही. एका मानवाचेच रक्त दुसर्‍या गरजु मानवाला चालते.
महाराष्ट्र राज्यात रुग्णांसाठी दरवर्षी सुमारे साडेसात लाख बाटल्या रक्त लागते. ही गरज ७० ते ७५ टक्के पर्यायी बदली रक्तदाता किंवा व्यावसायिक रक्तदात्याकडून भागविली जाते. ह्याच्यासाठी आता ऎच्छिक रक्तदानाची गरज प्रत्येकाला समजायला हवी. मानवाच्या शरीरामधे साडेचार ते पाच लिटर रक्त असते. रक्तदानाच्या वेळी केवळ ३०० मिलि. रक्त काढले जाते. प्रत्येक रक्तदानानंतर साधारण ३६ तासामधे शरीरात रक्ताची पातळी पुर्ववत होते. तसेच साधारण २ ते ३ आठवड्यांमधे रक्तपेशीही पुर्ववत होतात. रक्तदान केल्याने कोणताही त्रास किंवा इजा होत नाही.
रक्तपेढयांमध्ये दान केलेल्या रक्ताचा गट निश्चित केला जातो. त्यानंतर रक्ताच्या एचआयव्ही, कावीळ इत्यादी आजारांच्या चाचण्या केल्या जातात. या चाचण्यांनंतर रक्त रक्तपेढयांमधून वेगळं केलं जातं. काही वेळा रक्तातील विविध घटक वेगळे केले जातात. जसं की, फ्रेश फ्रोझन प्लाज्मा, पॅकसेल ब्लड, सिरम इत्यादी. भाजलेले रुग्ण, अतिरक्तस्राव झालेले रुग्ण, गंभीर अत्यवस्थ रुग्ण यांना हे रक्त दिले जातं.

आमचा हेतू

  • रक्तदान म्हणजे जीवनदान होय. आपल्याद्वारे केलेले रक्तदान अनेकांचे जीव वाचवते. जेव्हा आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती रक्तामुळे आयुष्य आणि मृत्यू यांच्यामध्ये संघर्ष करते, अशावेळी आपण झोपेतून उठतो आणि रक्त व्यवस्था करण्यासाठी धडपडत असतो 
  • Jivandaan.in माध्यमातून आम्ही आपल्याला ठिकठिकाणी लागणारे रक्तदान कॅम्पची माहिती देण्यास सहायता करू
  • सरकार द्वारे राबवले जाणारे विविध उपक्रमांची माहिती या पोर्टल द्वारे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास मदत करू

कोण करू शकते "रक्तदान"?

  • कोणताही निरोगी व्यक्ती ज्याचे वय 18 ते 50 वर्षांदरम्यान असेल.
  • 60 किलोपेक्षा जास्त वजन.
  • ज्या व्यक्तीचे हिमोग्लोबिनचे रक्त टक्केवारी 12 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.